आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाईंचा कळप हाकू शकणारा रोबो ऑस्ट्रेलियात तयार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गाईंचा कळप हाकू शकणारा चार चाकांचा रोबो ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीतील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या उपकरणास ‘रोव्हर’ नाव देण्यात आले आहे. शेतातून गाईंचा कळप डेअरीपर्यंत आणण्यासाठी रोव्हरची चाचणी घेण्यात आली.
चाचणीमध्ये गाईंनी रोव्हरला गुराखी म्हणून स्वीकारले, शेतक-यांनाही ही कल्पना आवडली, असे दुग्ध संशोधक व असोसिएट प्रोफेसर डॉ. केंद्रा केरिस्क यांनी सांगितले. दूध संकलन प्रक्रियेमध्ये रोबोचा वापर केला जातो. मात्र, संशोधकांनी त्याशिवाय पशुपालन क्षेत्रात रोबोचा वापर करण्याचा विचार केला. शेतातील फळझाडे व फळांवर लक्ष ठेवण्यासाठी सध्या रोबोचा वापर केला जातो. सिडनी युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांचे पथक शेती कामात उपयोग येऊ शकणा-या रोबोवर संशोधन करत आहेत. सध्याचा रोबो माणसाकडून नियंत्रित केला जातो.