सॅनफ्रान्सिस्को - ट्विटर या सोशल नेटवर्किंगचे अद्ययावत मोबाइल सॉफ्टवेअर जारी करण्यात आले असून या नव्या सॉफ्टवेअरमध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांना एखाद्या टिवटिव्याला थेट छायाचित्रे आणि वैयक्तिक संदेशही पाठवण्याची सोय करून देण्यात आली आहे. ट्विटरच्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये संदेश किंवा छायाचित्रांची सार्वजनिकरीत्या देवाणघेवाण करावी लागत होती.