आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता सुपर कॉम्प्युटर करेल कर्करुग्णांना मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - आयबीएमने वॉटसन या सुपर कॉम्प्युटरला कर्करोगाविरोधात लढाईसाठी सज्ज केले आहे. अशा प्रकारचा पहिलाच व्यावसायिक उपक्रम असून या अंतर्गत कर्करुग्णांना मदत केली जाणार आहे.

आयबीएम कंपनीने वेलपॉइंट या विमा कंपनीसह न्यूयॉर्कच्या मेमोरिअल स्लोअन कॅटरिंग कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात ही योजना सुरू केली. हे सुपर कॉम्प्युटर 6 लाख वैद्यकीय चिकित्सा, 42 मेडिकल जर्नलची 20 लाख पाने तसेच कर्करोग विज्ञानाच्या क्लिनीकल परीक्षणांच्या आधारे कर्करुग्णांची मदत करणार आहे. हा संगणक रुग्णाच्या माहितीचे जलद विश्लेषण करेल. या विश्लेषणाच्या आधारे रुग्णांवर अचूक तसेच तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.