Home »International »Bhaskar Gyan» Now Tablate Come As Paper

आता येणार कागदासारखा टॅब्लेट

वृत्तसंस्था | Jan 09, 2013, 06:12 AM IST

  • आता येणार कागदासारखा टॅब्लेट

लंडन - तंत्रज्ञानाचा चमत्कार लवकरच टॅब्लेटच्या निर्मितीमध्ये पाहायला मिळणार आहे. कागदासारखा हलकाफुलका आणि कसाही वाकू शकणारा टॅब्लेट बाजारात येऊ घातला आहे. त्यामुळे टिचण्या-फुटण्याची चिंता आता सोडून द्यायला काहीच हरकत नाही !

टॅब्लेटच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक अत्यंत लवचिक आहे. इलेक्ट्रॉनिक्स पेपरच्या माध्यमातून नैसर्गिक मानवी संवादासाठी ते उपयुक्त आहे. हलका, पातळ परंतु तितकाच मजबूत हा टॅब आहे, असे प्लास्टिक लॉजिकचे सीईओ इंद्रो मुखर्जी यांनी सांगितले. डिस्प्लेचीही मोठी सुविधा टॅबमध्ये उपलब्ध होणार आहे. टॅबमधील डिस्प्लेचा वापर करताना विविध अ‍ॅप्स किंवा विंडोजची मदत घेण्याची गरजही भासणार नाही. 5 वर्षांत हा पेपरटॅब तुमच्या लॅपटॉपची जागा घेईल, असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे.

पेपर टॅबमध्ये ग्राहकांना इ-बुक्सची सुविधाही मिळणार आहे. त्यासाठी युजरला केवळ टॅब कागदासारखा दोन भागात वाकवावा लागेल. विविध प्रकारच्या आॅनलाईन दस्तावेजाच्या उपयोगासाठीही पेपर टॅब उपयोगी आहे, असे ह्यूमन मीडिया लॅबचे संचालक रोएल व्हर्टीगल यांनी सांगितले. एका पेपर टॅबमधून दुस-या टॅबकडे फोटो पाठवण्याची सुविधाही यात आहे. ती देखील अत्यंत सोपी आहे. एका टॅबला दुस-या टॅबमधील इमेल डङ्खाफ्ट दाखवल्याबरोबर ही प्रक्रिया झटपट पूर्ण होते. फोटो आपोआप इ-मेलला जोडल्या जातो. आगामी पाच ते दहा वर्षांत संगणक आणि टॅब्लेट भिंतीवर कागद डकवल्यासारखे ठेवता येणार आहेत, असे इंटेलचे संशोधन विभाग प्रमुख रॅन ब्रॉटमन यांनी सांगितले.
काय आहेत वैशिष्ट्ये
हाय रिझोल्युशन, 10.7 इंची डिस्प्ले, फ्लेक्झिबल टचस्क्रीन, आय-5 प्रोसेसर. याशिवाय ई-बुक्सची सहज सुविधाही मिळणार. वेगवान डाटा ट्रान्सफर.
फोटो जातील आपोआप
एका टॅबचा ई-मेल ड्राफ्ट दुस-या टॅबला दाखवला की फोटो आपोआप अ‍ॅटॅच होऊन पाठवला जाईल.
भिंतीवर लावा टॅब्लेट
येत्या दहा वर्षांत संगणक व टॅब्लेट भिंतीवर कागद डकवल्यासारखे सहज ठेवता येतील.

शोध कोणाचा ?
कॅनडातील क्वीन्स विद्यापीठातील तंत्रज्ञांनी लवचिक स्वरूपाचा टॅब्लेट विकसित केला आहे. प्लास्टिक लॉजिक आणि इंटेल लॅब्सच्या सहकार्याने या क्रांतिकारक गॅजेटचा जन्म झाला आहे. लवचिक स्वरूपाचे हे गॅजेट असल्याने तुटण्याचा धोका नाही.

शोध कोणाचा ?
कॅनडातील क्वीन्स विद्यापीठातील तंत्रज्ञांनी लवचिक स्वरूपाचा टॅब्लेट विकसित केला आहे. प्लास्टिक लॉजिक आणि इंटेल लॅब्सच्या सहकार्याने या क्रांतिकारक गॅजेटचा जन्म झ्रााला आहे. लवचिक स्वरूपाचे हे गॅजेट असल्याने तुटण्याचा धोका नाही.

Next Article

Recommended