आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मास्क घातल्याने मिळणार प्लास्टिक सर्जरीसारखे सौंदर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी डिझायनर झुओयिंग ली यांनी ‘द युनिफेस’ नामक एक असे मास्क तयार केले आहे जे घातल्याने दररोज मेकअप करण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळते. इतकेच नव्हे तर प्लास्टिक सर्जरीसारखे सौंदर्यही लाभते. मास्क घातल्यानंतर व्यक्तीला छान टपोरे अँनिमेटेड डोळे, सुंदर नाक आणि पातळ गालाचा सुंदर असा एकत्रित लूक मिळतो. बायोनिक स्किनपासून हे मास्क तयार करण्यात आले असून ते मानवी त्वचेसारखेच वाटते. मास्क घातल्यानंतर चेहर्‍यावरील हावभावसुद्धा बदलता येऊ शकतात. पातळ असल्यामुळे यामधून श्वासही घेता येते. इतकेच नव्हे तर मास्क घालून झोपताही येते. मास्क चेहर्‍यावर व्यवस्थितपणे बसविण्यासाठी यासोबत एक विशेषप्रकारचा गोंदही देण्यात येतो. 25 हजार रुपयांमध्ये याची ऑनलाइन ऑर्डर देता येईल. पसंत न पडल्यास त्यास महिनाभरात परतही करता येते.
lovethesepics.com