आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनपीसी अधिवेशन:चीनमध्ये औपचारिक सत्तांतरणाला सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये दहा वर्षांनी होणाºया सत्ता हस्तांतरणाला रविवारी औपचारिक सुरुवात झाली. चीनच्या संसदीय सल्लागार मंडळाच्या वार्षिक अधिशेनात हु जिंताओ यांच्याकडून नवनिर्वाचित नेते झी जिनपिंग औपचारिकरीत्या सत्ता हाती घेतील. 2200 सदस्यांच्या चायनिज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टिव्ह कॉन्फरन्समध्ये (सीपीपीसीसी) या वेळी पहिल्यांदाच कम्युनिस्ट पार्टीशी संबंध नसलेल्या अभिनेते, लेखक व धार्मिक गुरुंचा मोठा सहभाग आहे. यामध्ये अभिनेता जॅकी चॅन, नोबल पुरस्कार विजेते मो यान यांचा समावेश आहे.

जिंताओ यांना बळकट अर्थव्यवस्थेचे श्रेय
नवे नेते झी जिनपिंग हू जिंताओ यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. ग्रॅँट हॉल येथून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सीपीपीसीसीचे अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. यामध्ये जिनपिंग यांची राष्‍ट्राध्यक्षपद नियुक्ती करण्यात येईल. या घटनेने जिंताओ यांचा दहा वर्षांचा सत्ताकाळ संपुष्टात येईल. जिंताओ यांनी आपल्या कारकीर्दीत चीनला जगातील क्रमांक दोनची अर्थव्यवस्था दिली.

ली केक्विंग नवे पंतप्रधान
जिनपिंग यांची गेल्या नोव्हेंबरमध्ये पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. ते पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाची घोषणा करणार आहेत. ली केक्विंग नव्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. गेल्या चार महिन्यांतील राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग राष्‍ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आहेत. पक्षाचे नेते बो झिलाई भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात आहेत. झिलाई यांच्याबाबत निर्णय घेणे जिनपिंग यांच्यासमोरील पहिले आव्हान आहे.