आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्षांच्या हुकुमावरूनच नागरिकांवर निगराणी; अमेरिकेच्या राष्ट्रीय संस्थेचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- जागतिक पातळीवर फोनच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या निगराणीत काहीही गैर नाही. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसारच हा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचा दावा अमेरिकेच्या हेरगिरीविषयक राष्ट्रीय संस्थेने (एनएसए) शनिवारी केला.
जगातील काही धोकादायक भागातही अमेरिका निगराणी करते. परदेशी हेरगिरीविषयक कायद्याचे मात्र यातून उल्लंघन झालेले नाही. तसा प्रयत्नही केला जाणार नाही, असे एनएसए महिला प्रवक्त्या व्हॅनी विन्स यांनी स्पष्ट केले. एनएसए प्रत्येक दिवशी 5 अब्ज एवढे दस्ताऐवजाचे संकलन करते, असे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिल्याच्या दुसर्‍या दिवशी राष्ट्रीय हेरगिरी संस्थेने हा दावा केला आहे.
निगराणीचा कार्यक्रम सर्वव्यापी नाही. आम्ही सर्व सेलफोनला ट्रॅक केलेले नाही किंवा त्याची माहितीदेखील बाळगून नाही. परंतु ही सुविधा जगातील धोकादायक भागात वापरण्यात येत असल्याचे मात्र त्यांनी कबूल केले. परदेशी संभाषणावर निगराणी केली जात असल्याचे एनएसएच्या अधिकार्‍याने मान्य केले. परंतु देशांतर्गत पातळीवरील फोन संभाषणांवर मात्र आम्ही लक्ष देत नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. देश पातळीवरील माहिती गोळा करण्याचे ध्येयदेखील संस्थेसमोर आहे.