आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा पहिल्या अणुबॉम्बची: हिरोशिमा भुईसपाट करणा-या अणुबॉम्बची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू मेक्सिको - ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब डागले होते. यात ही दोन्ही शहरे उध्‍दवस्त झाली. अणुबॉम्ब हल्ल्यात हिरोशिमात एक लाख 35 हजार आणि नागासाकीत 50 हजार लोक मारली गेली.जगातील पहिल्या अणुबॉम्बची अत्यंत दुर्मिळ छायाचित्रे अमेरिकेच्या 'लॉस एलामोज नॅशनल लॅब्रोटरी'ने प्रसिध्‍द केली आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. संबंधित छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यात अणुबॉम्ब निर्मितीपासून जपानवर डागण्‍यापर्यंत छायाचित्रांचा समावेश आहे.
मागील वर्षी लॉस एजमोजने बॉम्बशी संबंधित 515 छायाचित्रे शेअर केली आहे. 'अॅटम बॉम्ब: द टॉप सिक्रेट इनसाइड स्टोरी ऑफ लिटल बॉय अँड मॅन' पुस्तकाचे लेखक जॉन कोस्टर मुलॅन जुनी छायाचित्रे पाहुन त्यातच रमून जातात. लॉस एलामोज लॅबमध्‍ये' द मॅनहट्टन प्रोजेक्ट' अंतर्गत अणुबॉम्बची निर्मिती चालू होती, असे मुलॅन यांनी सांगितले. यास लॅबमध्‍ये गुंतलेले वैज्ञानिक 'द गॅजेट' या नावाने संबोधत असे. न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात जुलै 1945 मध्‍ये अणुबॉम्बचे परीक्षण करण्‍यात आले.
पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा पहिल्या अणुबॉम्बच्या संबंधित छायाचित्रे....