आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील घटना: दोन वर्षांच्या बालकाचा चावा घेतल्याने नर्सची गच्छंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका बालकाच्या चेह-यावर नर्सने चावा घेतल्याची विचित्र घटना चीनमध्ये उजेडात आली. या निर्दयी कृत्याबद्दल नर्सला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.


नर्सने चावा घेतलेले हे मूल अगोदरच हृदयविकाराने पीडित होते. त्यात नर्सने असे कृत्य केल्याच्या दुस-या दिवशी त्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जनतेमध्ये रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप निर्माण झाला. नागरिकांकडून रोष व्यक्त झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ संबंधित नर्सला नोकरीवरून काढले. नर्स म्हणून आपल्या सेवेची आचारसंहिता भंग केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. गिझोऊ प्रांतातील सरकारी रुग्णालयातील एका अधिका-यालाही निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारने मृत बालकाच्या कुटुंबीयांची आणि नागरिकांची या घटनेबद्दल माफी मागितली आहे.