आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या भषणाद्वारे चीनची मुले शिकणार इंग्रजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनची राजधानी बीजिंग येथील इंग्रजी शिकवणार्‍या शिक्षकाने इंग्रजी शिकण्याची नवीन पध्दत शोधून काढली आहे. यासाठी त्याने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भाषणे विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाषणे विकत मिळण्यासाठी शिक्षकाने ओबामांना पत्र देखील लिहले आहे. या भाषणांच्या आधारे तो विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिकवणार आहे.
क्यू गैंग असे या शिक्षकाचे नाव असून, तो एक इंग्रजी कोचिंग संस्था चालवतो. मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी क्यू गैंग राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या भाषणाचे हक्क विकत घेणार असून, त्यासाठी लागणारे मूल्य किती असेल याची चैकशी देखील त्याने केली आहे.
या आगळ्या वेगळ्या शिकवण्याच्या पध्दतीवर काही लोकांकडून प्रशंसा केली जात आहे. तर, काही लोकांनी ही संस्थेची जाहिरात करण्याचा मार्ग असल्याचे म्हटले आहे.