आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Obama Appreciate Indian American Frank Islam New Bungalow, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय वंशाच्या मित्राचे घर पाहून ओबामा सुखावले, पाहा महासत्तेच्या अध्‍यक्षांना आवडलेले घर..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतीय वंशाचे मित्र फ्रँक इस्लाम यांचा बंगला पाहून सुखावले. इस्लाम उत्तर प्रदेशातील आझमगडचे मूळ रहिवासी आहेत. ओबामा यांनी इस्लाम यांच्या बंगल्याचे छायाचित्र इंटरनेटवर पाहिले आणि त्यानंतर त्यांनी इस्लाम यांना फोन केला. त्यांनी घरातील ग्रंथालयात ठेवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण टेबलाच्या रचनेबद्दल त्यांचे कौतुक केले. अशाच प्रकारचा टेबल ओव्हल हाऊसमध्ये ठेवलेल्या रेझलूटची प्रतिकृती आहे. इस्लाम यांनी गेल्या वर्षी वॉशिंग्टनमधील सर्वात महागड्या पोटोमॅक भागात दहा एकर क्षेत्रात बंगला बांधला आहे. ओबामा यांनी फोन करण्याआधी उपराष्ट्राध्यक्ष जो ब‍िडेन ११ जुलै रोजी इस्लाम यांच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांनी बंगल्याचे कौतुक केले होते.

बागही काही कमी नाही
इस्लामयांच्या हवेलीतील बाग लंडनच्या हँपटन कोर्ट पॅलेसची हुबेहूब प्रतिकृती आहे. दुसरा बगीचा व्हाईट हाऊसमधील रोज गार्डची प्रतिकृती आहे.

३० हजार घेऊन आले होते इस्लाम
इस्लाम१५ व्या वर्षी अमेरिकेत आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. मात्र, सध्या ते यशस्वी व्यावसायिक आहेत.

आलिशान बंगल्याची वैशिष्ट्ये
7 वर्षांत तयार
22 बाथरूम
09 कोटी रुपये खर्च
05 बेडरूमचे गेस्ट हाऊस
60 झुंबरे
14 बेडरूम
पुढे पाहा ओबामांनी पाहिलेले भारतीयाचे घर..