आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ची दहशत संपवण्यासाठी अमेरिका करणार विमानहल्ले : बराक ओबामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - व्हाइट हाउसमध्ये नॅशनल सेक्युरिटी टीमबरोबरच्या मीटिंगदरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इराक मधील दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराला कारवाईची परवानगी दिली आहे. ISIS चा वाढता धोका आणि इराकमध्ये सुरू असलेला नरसंहार थांबवण्यासाठी अमेरिका मर्यादीत प्रमाणात विमानहलेले करू शकते, असे ओबामा म्हणाले आहेत.
दहशतवाद्यांनी घेरलेल्या इराकमधील काही समुदायांना अन्न पाण्याची अत्यंत तीव्र आवश्यकता आहे. अशा नागरिकांसाठी अमेरिकेच्या वतीने विमानातून मदत पोहोचवली जात असल्याचे व्हाईट हाऊसतर्फे काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्करातील सुत्रांच्या मते, अमेरिकेतर्फे केली जाणारी शस्त्रांची मदतही वाढवली गेली आहे. इराकला श्रेपणास्त्रे, बॉम्ब आणि हातगोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जात आहे.
नॅशनल सेक्युरिटी टीमबरोबर झालेल्या बैठकीनंतर ओबामा म्हणाले की, 'आज अमेरिका मदतीसाठी पुढे येत आहे. जर आयएसआयएसचे दहशतवादी कुर्दीश भागाकडे सरकले तर त्यांना धडा शिकवण्यासाठी अमेरिका विमानहल्ले करेल. तसेच येथे अडकलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही हल्ले करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सुमारे एका दशकाच्या युद्धानंतर 2011 च्या सुरुवातीस अमेरिकेने इराकमधून सैन्य परत बोलावले होते. इराकमधील हे युद्ध संपवण्यासाठी बराक ओबामा यांनी बरेच प्रयत्न केले होते. पण आता पुन्हा इराक सरकारच्या विनंतीवरून अमेरिका हे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सिंजर पर्वतावर पोहोचली मदत
सिंजर पर्वतावर हजारो यझीदी नागरिक फसलेले आहेत. त्यांना अन्न पाण्याची मदत पुरवली असल्याचे त्यांनी सांगितले. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी या सर्वांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती करण्यास सुरुवात केल्याने, त्यांनी घरे सोडून पळ काढण्यास सुरुवात केली आहे.
कुर्दीश सीमेवरील चेकपॉइंटवर दहशतवाद्यांनी कब्जा केल्याचे वृत्तसंस्थेने जारी केलेल्या छायाचित्रांत दिसत आहे. हे स्थान अरबिलपासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे अरबिल हा कुर्दीश समुदायाचा बालेकिल्ला मानला जातो. येथे 15 लाख कुर्दीश नागरिक राहतात. कुर्दीश सैन्याने मात्र त्यांच्या चेकपॉईंटवर ताबा मिळवल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.