आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Aviod News Chennel, Entertain To Other Chennel

मीडियाला टाळले; ओबामांचे मनोरंजन वाहिन्यांना प्राधान्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा आखाडा आता आरोप-प्रत्यारोपांच्या दिशेने जात आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष्य करताना रिपब्लिकन गटाने त्यांच्यावर मीडियाला टाळत असल्याचा आरोप केला. अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर ओबामा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्याऐवजी मनोरंजन वाहिन्यांशी चर्चा करत असल्याचा टीका करण्यात आली आहे.
रिपब्लिकन गटाकडून ओबामांना असा सवाल करणारे पोस्टर जारी करण्यात आले आहे. ओबामा मीडियाला का टाळत आहेत ? ते खोटी आश्वासने देत आहेत. हे विडंबन नव्हे. सत्य आहे, असा आशय असलेल्या पोस्टरचे शुक्रवारी रॉमनी यांच्या गटाने प्रकाशन केले. ओबामा यांनी आतापर्यंत ईएसपीएन, एन्टरटेन्मेंट टुनाइट, पीपल मॅगझिन, एफएम रेडिओंना अशा वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. अन्न तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणा-या ओबामा यांचे वागणे खोटे असल्याचा आरोप रॉमनी गटाकडून या मोहिमेतून करण्यात येत आहे. ओबामा यांनी 8 जून रोजी एक अधिकृत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद त्यांची शेवटची होती. त्या वेळी जी-20 संमेलन सुरू असताना त्यांनी एकापाठोपाठ एक मुलाखतींचा सपाटा लावला होता याकडे रॉमनी गटाने नागरिकांचे लक्ष वेधले आहे.