आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Award Presented To Industrialist Laxmi Mittal

कारखाना स्थापन केल्याबद्दल उद्योगपती लक्ष्‍मी मित्तल यांचे ओबामांकडून खास आभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत पोलाद कारखाना काढून शेकडो नागरिकांना रोजगार पुरवणारे भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्याबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ऐन मंदीच्या काळात मित्तल यांनी क्लेव्हलँड भागात गुंतवणूक करून शेकडो रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल लक्ष्मी मित्तल यांचे आभार, अशा शब्दांत ओबामा यांनी ही अमेरिकी नागरिकांच्या वतीने ही कृतज्ञता व्यक्त केली.
ओहियोस्थित आर्सेलर-मित्तल ग्रुपच्या क्लेव्हलँड स्टील फॅक्टरी कारखान्यास गुरुवारी ओबामा यांनी खास भेट दिली. कामगारांप्रमाणे हेल्मेट, चष्मा घालून कारखान्याची पाहणी केली. तेथील काम, उत्पादन, अवाढव्य मशीनची माहिती करून घेतली. कामगार, कर्मचा-यांशी चर्चा केली. त्यानंतर कारखान्यातच त्यांनी छोटेखानी सभाही घेतली. या वर्षी आर्सेलर-मित्तल समूहाने 7 कोटी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करून 150 रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.
ओबामांची भेट ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगून क्लेव्हलँडच्या कारखान्यात पुढील 100 वर्षे पोलाद उत्पादन होत राहील, अशी ग्वाही या वेळी मित्तल यांनी दिली.
मित्तल यांचा विनम्रपणा
मित्तल यांनीही या प्रसंगी कामगारांबद्दलचा आदर आपल्या कृतीतून दाखवला. ओबामा यांच्या भाषणापूर्वी परिचय करून देण्याची वेळ येताच मित्तल यांनी क्लेव्हलँड कारखान्यात गेल्या 40 वर्षांपासून क्रेन ऑपरेटरचे काम करत असलेल्या टॉम स्कॉट यांच्या हातात माइक सोपवला. त्या वेळी स्कॉट व उपस्थित कामगारही भारावून गेले.