आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Obama Celebrated His 52 Birthday In Indian Restourant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबामांनी मिशेलसोबत आपला 52 वा वाढदिवस भारतीय रेस्तरॉंमध्‍ये केला साजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भरगच्च वेळापत्रकातून थोडासा वेळ काढून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपला 52 वा बर्थडे पत्नी मिशेलसह एका पॉश भारतीय रेस्तराँमध्ये गुरुवारी रात्री साजरा केला. अत्यंत खासगी, गोडगुलाबी क्षणांचे साक्षीदार म्हणून अर्थातच भारतीय पक्वानांची त्यांना सोबत होती आणि हा स्वादिष्ट योग जुळून आला होता तो रसिका रेस्तराँमुळे !


व्हाइट हाऊसपासून जवळच असलेल्या वेस्ट अँड भागात रसिका रेस्तराँ आहे. अस्सल भारतीय स्वादिष्ट भोजनासाठी ते ओळखले जाते. रेस्तराँला आपल्या चविष्ट सेवेबद्दल अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. ओबामा मसालेदार भारतीय पदार्थांचे शौकीन आहेत. त्यामुळे त्यांनी अविस्मरणीय क्षणासाठी भारतीय रेस्तराँची निवड केली. गुरुवारी रात्री ओबामांच्या मोटारींचा ताफा पेनिसिल्व्हेनिया अ‍ॅव्हेन्यू परिसरात आला त्या वेळी कुणाचेही फारसे लक्ष गेले नव्हते.


जोडी तुझी नि माझी
वाढदिवसाच्या निमित्ताने डिनर डेट ठरल्यानंतर ओबामा दांपत्य रेस्तराँला अगदी टिपिकल अमेरिकन जोडप्यासारखेच सजून गेले होते. त्यातही मिशेलबार्इंचा नट्टापट्टा थोडा जास्तच होता. मिशेल यांनी गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तो बॅकलेस होता. ओबामांनी मात्र डेटवर जाताना आपला नेहमीचा सूट घालणेच पसंत केले होते.


मालक दिल्लीतला
रसिका रेस्तराँचे मालक अशोक बजाज मूळचे दिल्लीचे आहेत. त्यांच्या नाइटब्रिज समूहाचा रेस्तराँ उद्योग वर्तुळात चांगला दबदबा आहे. बजाज 25 वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. लंडन येथील त्यांच्या रेस्तराँने उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळवला आहे.


काय चाखले ?
तवा, तंदूर, शेगडीवर तयार होणा-या खास गरमागरम भारतीय पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला. शिवाय भारताच्या विविध भागांतील अस्सल मसालेदार पदार्थांचीही चव या अमेरिकी ‘फर्स्ट कपल’ने घेतली.


क्लिंटन यांना पुरस्कार
माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व प्रसिद्ध शो होस्ट ओप्रा विन्फ्रे यांचा लवकरच राष्ट्राध्यक्ष पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. मेडल ऑफ फ्रीडम म्हणून त्याची ओळख आहे. यंदा हा पुरस्कार 16 व्यक्तींना दिला जाणार आहे.