आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Obama Family Annual Expenditure 1.4 Billion Dollar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबामा कुटुंबाचा खर्च 1.4 अब्ज डॉलर, ब्रिटिश राजघराण्यालाही मागे टाकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कुटुंबावर होणारा वार्षिक खर्च 1.4 अब्ज डॉलर एवढा आहे. ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च 20 पटींनी अधिक आहे. यापैकी सर्वाधिक खर्च ओबामा यांची सुरक्षा आणि त्यांच्या सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांवर होतो.

रॉबर्ट कॅथ ग्रे यांच्या पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आला आहे. देशातील एका परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी करदात्यांचा पैसा वाया घालवायचा नाही, असा आंदोलकांचा सूर होता. शेकडो सिक्रेट सर्व्हिस एजंट्स, हवाईदलाचे सुरक्षित विमान, सदोदित ओबामांच्या सेवेत राहणारे डॉक्टरांचे एक पथक यांचाही खर्च यामध्ये समाविष्ट आहे. ओबामा कुटुंबाच्या मनोरंजनासाठी आणि घराच्या देखरेखीसाठीही मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो.
0ओबामांच्या ‘बो’ कुत्र्याला सांभाळणार्‍याला 1 लाख डॉलरचा मेहनताना दिला जातो.
0 ओबामांच्या सेवेतील 226 कर्मचार्‍यांवर 1 लाख डॉलरहून जास्त खर्च. राष्ट्राध्यक्ष कधीही त्यांचे पगार वाढवू शकतात.
0 ओबामा यांची एकूण संपत्ती 1 कोटी 18 लाख डॉलरची आहे.
0 राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा वार्षिक पगार 4 लाख डॉलर एवढा आहे.