वॉशिंग्टन - युद्धग्रस्त इराकमध्ये अतिरिक्त 300 अमेरिकी सैनिकांची फळी तैनात करण्यात येणार आहे. अमेरिकी वकिलात, बगदाद विमानतळावर ही सुरक्षा फळी तैनात करण्यात येणार आहे.
बगदादमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी सैनिकांची 200 जणांची तुकडी तैनात करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेस नेत्यांना दिली. अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या अतिरिक्त लष्करी तुकडीसोबतच रोटरी विंग विमाने, गुप्तचर, निगराणी करणार्यांचाही त्यात समावेश आहे. इराकमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत ही तुकडी तिथेच राहील, असे ओबामा यांनी सांगितले. या 200 जणांव्यतिरिक्त सेंट्रल कमांड भागातील आणखी 100 सैनिकांची तुकडीही बगदादला हलवण्यात येणार आहे.