Home »International »Other Country» Obama Government Rit For Gay Marriage

समलैंगिक विवाहावरील बंदी हटवा, ओबामा प्रशासनाची कोर्टात याचिका

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 08:10 AM IST

  • समलैंगिक विवाहावरील बंदी हटवा, ओबामा प्रशासनाची कोर्टात याचिका

वॉशिंग्टन - समलैंगिक विवाहावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात यावी, अशी विनंती ओबामा प्रशासनाने अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. 1996 च्या कायद्याअंतर्गत ही बंदी लावण्यात आली होती. 1996 च्या कायद्यानुसार पुरुष आणि महिला यांच्यातील संबंधालाच विवाह म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकी न्यायालयात प्रशासनाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांचे पीठ 27 मार्च रोजी याचिकेवर सुनावणी होईल. डिफेन्स ऑफ मॅरेज अँक्टला (डीओएमए) संपुष्टात आणावे किंवा नाही, यावर निर्णय होणार आहे. हा कायदा समलैंगिकांतील विवाहावर प्रतिबंध निर्माण करणारा आहे.

पहिल्यांदाच सर्मथन
समलैंगिक विवाहाच्या मुद्दय़ावर सर्मथन करणारी कागदपत्रे दाखल करणारे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. 1996 च्या कायद्यातील कलम 3 राज्य घटनेने दिलेल्या समान संरक्षणाच्या हमीचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे. समलैंगिक विवाह करणार्‍यांना पुरुष-महिला विवाहासारखी सरकारी सुविधा देत नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

का निर्माण झाला प्रश्न?
खटल्यात समलैंगिक एडिथ विंडसरचेही प्रकरण आहे. त्याने 2007 मध्ये कॅनडामध्ये लग्न केले होते; परंतु त्याच्या 40 वर्षीय जोडीदाराचा मृत्यू झाला. त्याला 3.60 लाख डॉलर्सचा कर भरण्यास सांगण्यात आले. डीओएमए अंतर्गत तो विवाहित असल्याचे मानण्यात आले नाही.

व्हाइट हाऊसवर टीका
व्हाइट हाऊसने समलैंगिक विवाहासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी जोरदार टीका केली. समलैंगिक विवाहावरील बंदी सुरू ठेवावी, अशी विनंती गेल्या महिन्यात 10 सिनेटरकडून करण्यात आली होती.

Next Article

Recommended