आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Obama Holds High Ground In Budget Fight With Republicans

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना झुकते माप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी २०१६ या आर्थिक वर्षासाठी ४ खर्व अमेरिकन डॉलर्सचे बजेट सदनात सादर केले आहे. अमेरिकेच्या संरचनात्मक प्रणालीत सुधारणा करणे आणि अतिश्रीमंत व व्यापार्‍यांवरील करात वाढ करण्याच्या उद्दिष्टाने हे बजेट सादर करण्यात येणार आहे. मध्यमवर्गीय अमेरिकन जनतेची आर्थिक स्थिती सुदृढ करण्याचे ध्येय यंदाच्या बजेटमध्ये ठेवण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टीचे बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये ओबामांनी आपले बजेट पाठवले आहे. या बजेटमुळे मध्यमवर्गीयांच्या वेतनात वाढ होईल, असा दावा ओबामांनी केला आहे. शिवाय नोकरीच्या संधीतही वाढ होईल. अनावश्यक खर्चांवर याद्वारे निर्बंध आणण्यात येतील. कर पद्धतीतील कमतरता दूर करण्यात येतील, असे आश्वासनही राष्ट्राध्यक्षांनी दिले आहे.