आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलमध्ये ओबामांची लिमोझिन फेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या इस्रायली दौर्‍यात आपल्या आवडीच्या 'द बिस्ट' लिमोझिन गाडीत बसू शकले नाहीत. बुधवारी त्यांची कार बिघडली. त्यामुळे जॉर्डनहून दुसरी कार मागवावी लागली. पेट्रोलऐवजी डिझेल टाकल्यामुळे त्यांची लिमोझिन गाडी बंद पडली होती, असे सांगण्यात आले.

बुधवारी सकाळची ही घटना. ओबामा ज्या गाडीत बसणार होते. ती कार अचानक बंद पडली. त्यामुळे तिला दुसर्‍या वाहनाने दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले. तांत्रिक कारणामुळे कार बंद पडली. म्हणूनच आम्ही एकसारख्या अनेक गाड्या मागवतो. कार बंद पडल्यामुळे मात्र ओबामा यांच्या दौर्‍यावर कसलाही परिणाम झाला नाही, असे अमेरिकेचे सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ता अँडविन डोनोवन यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्षांच्या दौर्‍याअगोदर अनेक बुलेटप्रूफ व बाँबप्रूफ गाड्या संबंधित ठिकाणी पाठवण्यात येतात. 2011 मध्ये ओबामा यांची द बिस्ट डब्लिन ही गाडी अमेरिकी राजदूत कार्यालयातून निघताना स्पीड ब्रेकरमध्ये अडकली होती. त्या वेळीही त्यांना दुसर्‍या गाडीने जावे लागले होते.

नियम म्हणजे नियम- शिस्त ही शिस्त असते. ती सर्वांसाठी सारखीच असते. त्याचा प्रत्यय गुरुवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना इस्रायली दौर्‍यावर आला आहे. इस्रायलमध्ये परदेशातून रोपटे आणण्यावर निर्बंध आहेत. कडक परीक्षणानंतरच परवानगी दिली जाते. ओबामांनी असेच एक रोपटे इस्रायलमध्ये आणले. रोपट्याचे परीक्षण न करताच ते राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरिस यांच्या निवासस्थानी आले, परंतु आता ते चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

इस्रायली सुंदरीशी डेट- अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी इस्रायलच्या 'ब्लॅक ब्यूटी'सोबत सहभोजनाचा आनंद घेतला. यितयिश टिटी एनाव (21) या सुंदरीशी त्यांची ही डेट होती. महिन्याभरापूर्वी यितयिशला इस्रायलमध्ये कोणीही ओळखत नव्हते, परंतु तिने मिस इस्रायलचा किताब पटकावताच ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ती मूळची इथिओपियाची आहे.

बंडखोरांचा हल्ला- ओबामा यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या दक्षिणेकडील प्रदेशाला पॅलेस्टाइन बंडखोरांनी गुरुवारी लक्ष्य केले, अशी माहिती इस्रायली पोलिसांनी दिली. सीमेवरील सेडेरॉट शहरात दोन रॉकेट डागण्यात आले. हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतली नाही.