आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Inhonest, Not Liable Person American Citizens View

ओबामा अप्रामाणिक, विश्वास ठेवण्यास अयोग्य, अमेरिकन नागरिकांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली असून बहुसंख्य अमेरिकन नागरिकांनी पहिल्यांदाच ओबामा हे अप्रामाणिक व विश्वास ठेवण्यास योग्य नसल्याचे मत नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. किनीपीक विद्यापीठाच्या या बहुप्रतिष्ठित सर्वेक्षणात याआधीचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्याप्रमाणेच ओबामा हे आता अमेरिकेतील जनतेमध्ये अप्रिय ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. बुश यांनाही कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावरच वाढत्या अप्रियतेचा सामना करावा लागला होता.
या सर्वेक्षणानुसार सुमारे 54 टक्के नागरिकांनी ओबामा यांना विश्वास ठेवण्यास अपात्र ठरवले आहे. मात्र, त्यांच्या अप्रियतेमध्ये झपाट्याने वाढ होत चालली असून 1 ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 49 टक्के नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. अवघ्या 12 दिवसांतच हे प्रमाण 54 टक्क्यांवर पोहोचले आहे. इतर सर्व राष्‍ट्राध्यक्षांप्रमाणेच ओबामा यांचाही अमेरिकन नागरिकांबरोबरील मधुचंद्र आता संपला असे किनीपीक विद्यापीठाचे टीम मॅलोय यांनी सांगितले.