आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊस सोडताच ओबामा-मिशेल यांचा घटस्फोट होणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांच्याकडे जगभरात आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते. ओबामांचे कुटुंबही अनेकदा सुट्या एकत्र घालवताना दिसते. अमेरिकेच्या वृत्तपत्रांमध्ये मात्र याच्या उलट्या बातम्या आहेत. ओबामा आणि मिशेल यांच्यामध्ये सध्या खूपच तणावाचे वातावरण आहे. मिशेल कधीही ओबामा यांना घटस्फोट देऊ शकतात किंवा व्हाइट हाऊस सोडताच ते विभक्त होणार, असेही काही जणांचे म्हणणे आहे.

दोघांची पहिली भेट 1989 मध्ये झाली होती. त्या वेळी हे दोघे शिकागोच्या एका लॉ फर्मसाठी काम करायचे. ओबामा इलिनॉय स्टेटचे सिनेटर होते. 2000 मध्ये ओबामा निवडणुकीत पराभूत झाले, त्या वेळीही या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. पण त्याच वेळी त्यांच्या लहान मुलीचा म्हणजेच साशाचा जन्म झाला. त्यामुळे घटस्फोट टळला होता. ओबामा यांच्या जीवनावरील एका पुस्तकातील मजकुरानुसार 2009 मध्येही या दोघांचा वाद तणावापर्यंत पोहोचला होता, पण तेव्हाही तसे झाले नाही. या वेळी झालेला वाद दक्षिण आफ्रिकेतील सेल्फी प्रकरणामुळे वाढला आहे. त्यात डेन्मार्कच्या पंतप्रधान हॅले थॉर्निंग-श्मिट यांची ओबामांबरोबरची जवळीकही मिशेल यांना खटकली होती. हेही एक कारण असू शकते. मिशेल यांनी नुकताच 50 वा वाढदिवस साजरा केला.