आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Nominates Rahul \'Richard\' Verma As US Envoy To India

पहिल्यांदाच दिल्लीत भारतीय वंशाचा अमेरिकी राजदूत, भेटा राहुल रिचर्ड वर्मा यांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रिचर्ड राहुल वर्मा यांचे छायाचित्र.)
नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाचे रिचर्ड राहुल वर्मा यांची भारतातील अमेरिकी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ओबामा यांनी हा निर्णय घेऊन भारताशी असलेले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रिचर्ड वर्मा यांची नियुक्ती केली असली तरी या निर्णयावर अमेरिकी सिनेटचे शिक्कामोतर्ब व्हायचे आहे. परंतु, राहुल यांची नियुक्त पक्की मानली जात आहे. असे झाले तर दिल्लीत भारतीय वंशाचे पहिले अमेरिकी राजदूत ठरतील.
यापूर्वी रिचर्ड वर्मा अमेरिकेचे विदेश उपमंत्री राहिले आहेत. सध्या ते खासगी क्षेत्रात काम करीत आहेत. याच वर्षी मार्च महिन्यात नॅन्सी पॉवेल यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतातील अमेरिकी राजदूताचे पद रिक्त होते. ओबामा यांनी केलेल्या काही नियुक्त्यांमध्ये वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना बराक ओबामा म्हणाले, की वर्मा यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे. मला आनंद आहे, की अमेरिकेला जेव्हा अत्यंत गरज आहे तेव्हाच ते अमेरिकी नागरिकांना सेवा देण्यासाठी भारतात जात आहेत.
45 वर्षीय रिचर्ड वर्मा बराक ओबामा यांचे निकटवर्तीय समजले जातात. यापूर्वी त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्यासोबतही काम केले आहे. स्टेपटो अॅण्ड जॉन्सन एलएलपी अॅण्ड अल्ब्राइट स्टोनब्रिज ग्रुपमध्ये ते वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करीत आहेत. ते सिनिअर नॅशनल सिक्युरिटी फेलोही आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, रिचर्ड वर्मा यांची अमेरिकी नेत्यांसोबतची छायाचित्रे....