आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama On India Tour That Time Pakistani Governor Resign

ओबामांची भारत भेट, पाक राज्यपालांचा निषेधार्थ राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा यशस्वी भारत दौरा हा पाकिस्तानी सरकारचे अपयश असल्याचे एका पाकिस्तानी राज्यपालांनी म्हटले आहे. हा आरोप करतानाच त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिला.
पंजाब प्रांताचे राज्यापाल मोहंमद सरवर यांनी आपले पद सोडले आहे. त्यांनी बुधवारी रात्री राष्ट्राध्यक्ष ममनून हुसैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यांनी सरवर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नवीन नेमणूक होईपर्यंत पंजाबचे विधानसभा अध्यक्ष राणा इक्बाल यांच्याकडे राज्याचे तात्पुरता कार्यभार असेल. त्या अगोदर सरवर यांनी अगोदर नवाझ शरीफ यांच्यावर टीका केली होती. ओबामा यांची दुसरी भारत भेट पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर मोठे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला. वास्तविक पाकिस्तान हा अमेरिकेचा शीतयुद्ध काळापासूनच सहकारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. परंतु सरवर यांनी स्पष्टीकरण देण्याऐवजी राजीनामा दिला. दुसरीकडे भारतासोबत चर्चा करण्याची आम्हाला घाई नाही, असे भारतातील पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांनी गुरूवारी म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केली होती. भारत-अमेरिका सामरिक संबंध वाढल्यानंतर त्याचा परिणाम प्रदेश पातळीवर होऊ शकतो. असे पाकिस्तानने म्हटले आहे.