आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जी 20 परिषदेत ओबामा - पुतीन भेट अशक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरबँक(कॅलिफोर्निया) - अमेरिकेचा ‘जागल्या’ एडवर्ड स्नोडेनला रशियाने आश्रय देण्याच्या निर्णयावर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, तरीही या महिनाअखेरीस होणार्‍या जी 20 परिषदेसाठी ओबामा मॉस्कोला जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीबाबत त्यांनी कोणतेही मतप्रदर्शन केले नाही. पुतीन व ओबामा यांची स्वतंत्र भेट शक्य नाही, असे व्हाइट हाऊसमधील एका अधिकार्‍याने सांगितले.

अमेरिकेतील एनबीसी टीव्ही वाहिनीच्या द टुनाइट शो कार्यक्रमात ओबामा यांनी अनेक मुद्दय़ांवर स्पष्ट मते मांडली. त्यांनी बोस्टन बॉम्बस्फोट प्रकरणात सहकार्य केल्याबद्दल रशियाचे कौतुकही केले. मात्र, स्नोडेन यांना आर्शय दिल्याबाबत विचारणा केली तेव्हा, ओबामा म्हणाले, रशिया कधीकधी शीतयुद्धाच्या काळात जातो. या निर्णयामुळे मी निराश आहे, मात्र आपल्याला पुढे जायलाच हवे. अफगाणिस्तानमधून अल कायदा व पाकिस्तानातून ओसामा बिन लादेनचा खातमा केल्यानंतरही दहशतवाद संपुष्टात आला नाही. दहशतवाद आपल्यावर स्वार होण्याआधी आपण त्यावर स्वार होणे आवश्यक आहे. अमेरिका त्यासाठीच प्रयत्न करत आहे.


स्नोडेनने काय केले मला माहीत नाही
ओबामा म्हणाले, एडवर्ड स्नोडेनने प्रत्यक्षात काय केले याची माहिती मला नाही. तो इंटरनेटवर जो काही बोलला तेवढेच मला माहीत आहे. मी व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन अँक्टवर स्वाक्षरी केली हे वास्तव आहे. यामध्ये गुप्तचर अधिकारी आणि गुप्तचर संस्थांमध्ये कार्यरत व्यक्तींना संरक्षण मिळेल. अमेरिकेची सुरक्षा संकटात येईल अशी माहिती सार्वजनिक केली जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे.


काळजी घेतो, हेरगिरी नाही
प्रीझमसारख्या कार्यक्रमाबाबत ते म्हणाले, आपल्या लोकांवर पाळत ठेवली जात नाही,याचे आश्वासन देशवासीयांना देऊ इच्छितो. दूरध्वनी क्रमांक किंवा ई मेल ट्रॅक करण्याचे आमच्याकडे तंत्रज्ञान आहे. संभाव्य दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत.

* पाकिस्तानमध्ये अजूनही अतिरेक्यांचे अस्तित्व
* अमेरिकेमध्ये देशांतर्गत हेरगिरीची कोणतीही योजना नाही
*दूतावासांना धमकी महत्त्वपूर्ण, दहशतवादावर स्वार होणे आवश्यक
* येमेनवर ड्रोन हल्ले योग्य :वॉशिंग्टनमध्ये विदेश विभागाचे प्रवक्ते जेन साकी यांनी येमेनमधील अमेरिकी ड्रोन हल्ल्याचे सर्मथन केले आहे. या हल्ल्यानंतर अल कायदाने अमेरिकेला धमकी दिली. परिणामी अमेरिकेला 24 *देशांतील दूतावास बंद करणे भाग पडले.
* स्नोडेनला आर्शय दिल्यामुळे अमेरिका नाराज, मात्र जी-20 परिषदेसाठी रशिया दौरा