आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा-रॉमनी कांटे की टक्कर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणा-या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून या पदासाठी विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांना रिपब्लिकनचे मिट रॉमनी यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते, असे जनमत सर्वेक्षणात काही मुद्द्यांवर रॉमनी आघाडीवर दिसून आले आहेत.
सीएनएन, ओआरसी यांच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त निवडणूकपूर्व पाहणीतून हे स्पष्ट झाले आहे. या पाहणीत निवडणुकीचे भाकीत करण्यात आले आहे. रोमनी यांच्या बाजूने 45 टक्के, तर विरोधात 38 टक्के मते गेली. ओबामांच्या कामाविषयी 45 टक्के समाधानी, तर 47 टक्के नाराज आहेत. अन्य एका जनमत चाचणीत रोमनी-ओबामा यांच्यात अटीतटीचा
सामना दिसणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार ओबामा यांना 45, तर रोमनी यांना 46 टक्के मते मिळाली. ओबामा यांना सरासरी तीन टक्के मते अधिक मिळाल्याचे सांगितले जाते.
अर्थव्यवस्थेला पुन्हा चांगल्या स्थितीत आणण्याची धमक रॉमनी यांच्यात असल्याचे 53 टक्के नागरिकांना वाटते. ओबामा यांच्या बाजूने 40 टक्के मते पडली. ही जनमत चाचणी 11 व 12 जानेवारी रोजी घेण्यात आली.