आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी आणि कुटुंब यांच्यातील संतुलन राखताना ओबामांनीही खाल्ल्या खस्ता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - व्हाइट हाऊसमध्ये आल्यापासून कुटुंब म्हणून परस्परांसोबत राहण्याचा आनंद मिळतोय. त्याअगोदर मात्र आयुष्य खडतर होते, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व प्रथम महिला नागरिक मिशेल यांनी आपल्या भावना मांडल्या.

एक काळ असा होता, जेव्हा बराक वॉशिंग्टनमध्ये, तर मी शिकागोमध्ये नोकरीनिमित्त राहायचो. दोन सुंदर मुलींना सांभाळताना कसोटी होती, अशी आठवण मिशेल यांनी सांगितली. चाकरमान्या कुटुंबांसाठी आयोजित परिषदेत मिशेल यांनी खासगी आयुष्यातील पदर अलगद उलगडले. मुलींच्या जन्माच्या वेळची हकिगत अत्यंत वाईट होती. नोकरी आणि कुटुंब यांच्यातील संतुलन राखताना खूप खस्ता खाव्या लागल्या. मुलगी आजारी पडायची. त्यानंतर आमचा नंबर असायचा. प्रसूतीनंतर दाईला चांगल्या वेतनाची नोकरी मिळाल्याने तिने आमचे काम सोडून दिले होते. आमचे आणखी हाल झाले. साशा चार महिन्यांची असताना नव्या नोकरीच्या मुलाखतीसाठी लहानग्या साशाला घेऊन गेल्याचे मिशेल यांनी सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये, मिशेल यांनी दिली चूकीची कबूली

छायाचित्र - राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे कुटुंबियांसहचे संग्रहित छायाचित्र.