आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : आदेशाच्या 23 फैरी झाडून बंदूक कायदा सुधाराला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - शस्त्राशी संबंधित हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकी राष्‍ट्रा ध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी रात्री उशिरा 23 अध्यादेश जारी केले. त्यानुसार बंदुकीच्या विक्रीवर नियंत्रण आणि मानसिक आरोग्य कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. ओबामा यांनी दुसºया कार्यकाळाची शपथ घेण्याच्या चार दिवस आधी अध्यादेश जारी केले आहेत. या आदेशाला अमेरिकी काँग्रेसची मंजुरी मिळणे बंधनकारक नाही. 14 डिसेंबर रोजी सँडी हूक प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारात 20 विद्यार्थी आणि सहा शिक्षक ठार झाले होते. देशातील वाढत्या हिंसाचारामुळे पीडित कुटुंबांचा ओबामांना पाठिंबा आहे, तर बंदूक लॉबीकडून त्याला विरोध होत आहे.

अमेरिकेत दर 100 लोकांमध्ये 89 जणांकडे शस्त्र आहेत. देशाच्या राष्‍ट्रा ध्यक्षांमध्ये अब्राहम लिंकन, जेम्स गारफिल्ड आणि जॉन एफ केनेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर थ्रियोडोर रुझवेल्ट आणि रोनाल्ड रेगन जखमी झाले होते. गायक जॉन लेनन आणि समाजसुधारक मार्टिन ल्यूथर किंग हिंसाचाराचे बळी ठरत त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
महाठक ओबामा
ओबामा शक्तिशाली बंदूक लॉबीच्या निशाण्यावर आले. नॅशनल रायफल असोसिएशन या लॉबीने मंगळवारी ओबामाविरुद्ध मोहीम उघडली आहे. एका पोस्टरमध्ये ओबामांना ‘महाठक’ दाखवण्यात आले आहे. आपल्या मुलींना शाळेत शस्त्रसज्ज सुरक्षा कर्मचारी पुरवणारे ओबामा शाळांमध्ये मात्र शस्त्रधारी रक्षकांच्या तैनातीला मंजुरी देत नसल्याचा आरोप केला आहे.
ब्रिटिशविरोधी कायदा
अमेरिकेमध्ये 15 डिसेंबर 1791 रोजी दुसºया घटना दुरुस्तीअंतर्गत नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. ब्रिटिश आक्रमकांविरुद्ध सामना करण्यासाठी हा अधिकार देण्यात आला होता. बंदूक लॉबी त्याचाच फायदा घेत आहे. 200 वर्षांत अमेरिका गुलामीच्या कुप्रथेपासून मुक्त होऊन महासत्ता झाली असली तरी हा कायदा अद्याप अस्तित्वात आहे.
प्रमुख आदेश
नवीन शस्त्र परवाना जारी करताना ग्राहकाची पार्श्वभूमी तपासली जावी.
गुन्हेगारी कृत्य किंवा कौटुंबिक हिंसाचारात सहभागी व्यक्तीला शस्त्र विकले जाणार नाहीत.
शाळेत अधिक सुरक्षा पुरवली जाईल.
लोकांना मानसिक आरोग्याची सुविधा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल.