आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Stop Other Nations Spying,Its Only Drama Julian Assange Critised

दोस्त राष्‍ट्रांची हेरगिरी ओबामांनी रोखली;काही फरक पडणार नाही, असांझ यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - मोबाइल, संगणक घुसखोरी करून हेरगिरी केल्यामुळे जगभरातील अनेक राष्ट्रांचा रोष ओढवून घेणा-या अमेरिकेने नवे हेरगिरी धोरण जाहीर केले असून यापुढे अमेरिकेची दोस्त राष्ट्रे आणि सहकारी देशांच्या नेत्यांची हेरगिरी करण्यास राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मनाई केली आहे. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनी ओबामांच्या या घोषणेचे स्वागत केले मात्र विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांझ यांनी या घोषणेमुळे फारसा फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
ओबामा यांनी शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक हेरगिरी प्रकरणावर पहिल्यांदाच भाषण दिले. अमेरिकेसाठी धोकादायक नसलेल्या सामान्य माणसांची आम्ही हेरगिरी करत नाही. त्याचबरोबर आमचे मित्र आणि सहका-यांच्या संदेशांच्या देवाण-घेवाणीचीही निगराणी करणार नाही. विद्यमान स्वरूपातील निगराणी, हेरगिराचा हा कार्यक्रम बंद करण्यात येईल. काही परदेशी नागरिकांनाही त्यातून सवलत दिली जाईल. मात्र, निगराणीमुळे दहशतवादी कारवाया रोखण्यात बरीच मदत झाली आहे, असे ओबामांनी या वेळी स्पष्ट केले.
जर्मनी आणि ब्रिटन या दोस्त राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांच्या मोबाइलचीही अमेरिकेकडून हेरगिरी होत असल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर या दोन्ही देशांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे अमेरिके ला हे धोरण ठरवावे लागले.
सोयीस्कर दुर्लक्ष
ओबामांच्या भाषणाचा मुख्य रोख संसदेने मंजूर के लेल्या निगराणी कार्यक्रमावरच होता. परदेशात सुरू असलेल्या हेरगिरी, निगराणीच्या उपद्व्यापामुळे झालेल्या टीकेवर सोयीस्कर दुर्लक्ष केले.
अमेरिकी नागरिकांना आश्वासन
देशातील नागरिकांच्या खासगी आयुष्यात विनाकारण घुसखोरी केली जाणार नाही, पण कायदा लागू करणा-या संस्थांना पूर्ण अधिकार व यंत्रणा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
माफी मागणार नाही
व्यापक इलेक्ट्रॉनिक हेरगिरीबद्दल माफी मागणार नाही, असेही ओबामांनी ठणकावून सांगितले. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी निगराणी कार्यक्रम सुरूच ठेवणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करणेही आवश्यक असून फक्त त्याचा उपयोग मर्यादित प्रमाणात करण्यात येईल.
स्नोडेनमुळे देश पिछाडीला
अमेरिकेच्या हेरगिरीचा भंडाफोड करून जगभर खळबळ माजवणा-या एडवर्ड स्नोडेनबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्नोडेनचा विचार करत नाही, परंतु एनएसएच्या निगराणी कार्यक्रमाचा तपशील ज्या सनसनाटी पद्धतीने बाहेर आला त्यामुळे अमेरिकेच्या मोहिमेला धक्का लागला आहे. देश मागे पडला आहे.