आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूच्या वादळात ओबामांचे विमान फसले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गुरुवारी बेथलहॅमला निघण्यापूर्वी तेल अवीव शहरात वाळूचे प्रचंड वादळ घोंघावले. त्यामुळे अख्खे शहर धुळीने माखले. राष्ट्राध्यक्षांचे खास 'एअर फोर्स वन' विमान उडणे शक्य नव्हते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा पर्यायही तपासून पाहिला. पण अखेर कारचा ताफा घेऊनच ते बेथलहेमला गेले. जेरुसलेम ते बेथलहेम हा महामार्ग त्यामुळे साडेतीन तास बंद होता.

सुरुवातीपासून विघ्न- इस्रायलच्या दौर्‍यावर गेल्यापासून ओबामांच्या कार्यक्रमात सातत्याने विघ्ने येत आहेत. मंगळवारी त्यांची आवडती 'द बिस्ट' ही आलिशान लिमोझिन फेल झाली होती. त्यात पेट्रोलऐवजी डिझेल टाकण्यात आले होते.