आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा यांची चौथ्यांदा राष्‍ट्र पतिपदाची शपथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन-अमेरिकेचे राष्‍ट्र पती बराक ओबामा यांनी सोमवारी चौथ्यांदा शपथ घेतली. याआधी रविवारी त्यांनी शपथ घेतली होती. सुटी असल्याने सोमवारी सार्वजनिक समारंभात शपथविधी झाला. 2009 मध्ये राष्‍ट्रपती झाल्यानंतर शपथ घेताना चूक झाली होती. त्यामुळे ओबामा यांना दोनदा शपथ घ्यावी लागली होती. कॅपिटल हिल्समध्ये झालेल्या सोहळ्याला 10 लाख लोकांची उपस्थिती होती. गेल्या वेळी 18 लाख लोक होते. ओबामा यांना सरन्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट्स यांनी शपथ दिली आणि न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी उपराष्‍ट्र पती जो बायडेन यांना शपथ दिली.Z

रुझवेल्ट यांनी 4 वेळा घेतली होती शपथ : फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्यानंतर ओबामा हे चार वेळा शपथ घेणारे राष्‍ट्र पती ठरले आहेत. अर्थात रुझवेल्ट यांनी 1932, 1936, 1940 आणि 1944 मध्ये राष्‍ट्र पती झाल्यामुळे चार वेळा शपथ घेतली होती.
इनॉगरल स्पीच
*दशकभर चाललेला लढा संपत आहे, अर्थव्यवस्था रुळावर येत आहे.
*इतर देशांशी असलेल्या वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढू
* स्वातंत्र्य काही मूठभर लोकांच्याच नशिबी आहे हे आम्ही मानत नाही.
* हवामान बदलाच्या धोक्यांना उत्तर देऊ, नाही तर मुलांसोबत घात ठरेल.
* परदेशी नागरिकांचे स्वागत केले नाही तर आमचा प्रवास अधुरा राहील.
* सरकारी भूमिकेवर शतकानुशतके सुरू असलेली चर्चा संपुष्टात आणणे प्रगतीसाठी आवश्यक नाही, परंतु काम करत राहावे लागेल.
*शपथ देश आणि ईश्वराची आहे. कोणता पक्ष वा गटाची नाही.
दोन - दोन बायबल