आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांचा टीव्ही प्रचार 550 कोटींचा; व्हजिर्निया, फ्लोरिडा राज्यांवर अधिक खर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवडीसाठी बराक ओबामा यांनी काही महत्वाच्या राज्यांमधील दूरचित्रवाणीवरील प्रचारासाठी आतापर्यंत 550 कोटी रुपये (100 दशलक्ष डॉलर्स) खर्च केले आहेत. रिपब्लिकन प्रतिस्पर्धी मिट रॉमनी यांच्या विरोधी प्रचारापूर्वीच आपला प्रभावी व चिरकाल स्मरणात राहिल असा प्रचार करण्याच्या दृष्टीने ओबामा यांनी ही आघाडी उघडली आहे.
यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे रिपब्लिकन अथवा डेमोक्रॅटीक अशा कोणत्याही पक्षाला फारशी अनुकूल नसलेली राज्ये या निवडणूकीत निर्णायक ठरणार आहेत.या अधांतरी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ओबामांनी राज्या-राज्यामध्ये वेगवेगळी प्रचार मोहिम राबविली आहे.ओबामांच्या जाहिरात प्रचाराची व्यूहनितीही अत्यंत बारकाईने आखण्यात आली आहे. रॉमनी यांच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकणार्‍या ओहियो राज्यात ओबामांनी प्रचारावर सर्वाधिक खर्च के ला आहे. एकूण खर्चाच्या एक पंचमांश रक्कम त्यांनी ओहीयोत खर्च केली. त्याखालोखाल फ्लोरिडा,व्हजिर्निया यांचा क्रमांक आहे.
कमकुवत अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांवर लोकांकडे कौल मागण्याऐवजी ओबामांनी आपल्या प्रचारात रॉमनी यांच्यावर टिकेचा रोख ठेवला आहे. ओबामांच्या जाहिरातींपैकी 75 टक्के जाहिराती या रॉमनीवर टिकेचा भडीमार करतात. ओबामांनी जोरदार प्रचार सुरु केला असलातरीही प्रचारात रॉमनी यांची सुमारे 4-1 अशी आघाडी असल्याचे मिडीयातील प्रचारावर खर्चावर देखरेख करणार्‍या संघटनांनी म्हटले आहे. शुक्रवारी रॉमनी यांच्या रिपब्लिकन पक्षाला टार्गेट करणारी एक जाहिरात टि.व्ही.वर सुरु झाली आहे. बड्या धेंडासाठी रिपब्लिकन पक्ष कशी धडपड करतो हे दर्शवण्यात आले आहे. अब्जाधीशांसाठी 25 टक्के करक पात, तेल कंपन्यांना कर सवलती, परदेशात रोजगार संधी निर्माण करणार्‍या उद्योजकांना कर माफी आणि नोकरदार कुटूंबावर करवाढ, अशी ओबामांची जाहिरात आहे.
सुरक्षा रक्षकाकडूनच मिशेल ओबामा यांना जीवे मारण्‍याची धमकी