आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Obama Weighs Possible Military Response After Syria Chemical Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी आरमार सिरियाकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेने सिरियात हस्तक्षेप करण्याची तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्रालय पेंटागॉन येथून जगभरातील नेते आणि सिरियातील बंडखोरांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, तर आणि क्षेपणास्र सज्ज युद्धनौका भूमध्य सागरामध्ये तैनात करण्यासाठी रवाना केली आहे. त्यामुळे सिरियाविरुद्ध लष्करी कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरियातील रासायनिक हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून सिरियात नेमके काय घडले याचा तपास करीत आहोत, असे ओबामा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. संरक्षणमंत्री चक हेगल म्हणाले की, लष्कर सज्ज असून ओबामांचा आदेश मिळताच मोहीम सुरू करण्यात येईल.

दरम्यान, रासायनिक हल्ला नेमका केला कुणी यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी असाद सरकार समर्थक रशियाने हल्ल्याचे खापर बंडखोर सैनिकांवर फोडले आहे, तर फ्रान्सनेही असाद सरकारलाच जबाबदार धरले आहे.