आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांचे कवच ‘बीस्ट’ कार राजधानीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेम्स बाँडच्या चित्रपटात दिसणारी सशस्त्र आणि स्मार्ट कार सहजपणे डोळ्यासमोर
यावी, अगदी तशीच किंबहुना त्यापेक्षा काहीपट अधिक सुरक्षेच्या अनेक सुविधा असणारी बॉम्बप्रूफ कार दिल्लीत दाखल झाली आहे. बीस्ट असे गाडीचे नाव असून अर्थातच ती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिमतीसाठी सज्ज आहे. ओबामा यांच्या भारत दौ-यात बीस्ट कार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रजासत्ताकदिनी ओबामा संचलनाला हजेरी लावण्यासाठी जातील. परंतु खुद्द आेबामांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत दाखल होण्याचा निर्णय घेतल्यास अशा प्रकारे बॉम्बप्रूफ गाडी नाकारून प्रवास करणारे ते अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरतील.

कारण यापूर्वी दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची ओपन टॉप लिंकन काँटिनेंटल
गाडीत हत्या झाली होती. तेव्हापासून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष सार्वजनिक ठिकाणी अति
सुरक्षित अशा गाड्यांचा वापर करत आले आहेत. बिस्ट गाडी अत्यंत सुरक्षित वाहनांपैकी मानली जाते. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी अत्युच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही गाडी तयार करण्यात आली आहे. बिस्ट गाडी कोणत्याही एका मॉडेलचे नाव नाही. कारण गाडीचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या कंपनीचा आहे. अगदी चेसिस, दारे, हेडलाइट्स, साइड मिरर, डोअर हँडल हे विविध कंपन्यांत तयार झालेले आहेत. जनरल मोटर्स ब्रँडअंतर्गत ती जुळवून तयार करण्यात आली आहे. एका लिटरमध्ये ३.४ किलोमीटर असे बिस्टचे मायलेज आहे. त्यामुळे पर्यावरणवादी मात्र या कारच्या क्षमतेची खिल्ली उडवतात. दरम्यान, २०१३ मध्ये मात्र इस्रायलमध्ये या कारचे नुकसान झाले होते. त्या वेळी ट्रकने ही कार टो करून आणावी लागली होती.