आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणुबॉम्बचा ट्रिगर घेऊन भारतात येणार ओबामा, वाचा खास बॅगबाबत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात ताकदीचा देश म्हणून ज्या देशाची ओळख आहे त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसासाठी भारत दौ-यावर येत आहेत. या दौ-यावर येताना ओबामा आपल्यासोबत एक अणुबॉम्बचा ट्रिगर घेऊन येणार आहेत. मात्र, यामुळे घाबरण्याचे कारण नाही कारण हा प्रोटोकॉलचा भाग आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि अण्वस्त्र संपन्न देशाचे राष्ट्रप्रमुख आपल्यासोबत सुरक्षेच्या कारणास्तव अणुबॉम्बची बॅग ठेवतात. ज्याला न्यूक्लियर ब्रीफकेस म्हटले जाते. ही एक खास व सर्वात सुरक्षित बॅग मानली जाते. या ब्रीफकेसमधून जगातील कोणत्याही भागात अणु हल्ला करण्याची ताकद असते. अमेरिकेत याला 'न्यूक्लियर फुटबॉल'ही म्हटले जाते. ही मेटलिक ब्रीफकेस असते जिचे वजन 20 किलोपर्यंत असते. या बॅगमध्येच एक छोटासा एंटीना असतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेतही ही खास ब्रीफकेस विदेश दौ-यावर असते.
पुढे पाहा आणि वाचा, न्यूक्लियर फुटबॉल कसा दिसतो आणि कसे काम करतो...