आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama's Joyful 5 Hour Golf Game Came Under Reaction

पत्रकाराचे शीर कापल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देऊन पाच तास गोल्फ खेळले ओबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-मरथा वाइनयार्ड मैदानावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा)

वॉशिंग्टन - अमेरिकेचे पत्रकार जेम्स फॉले यांची हत्या हृदय पिळवटून टाकण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पाच तास गोल्फ खेण्यात मग्न होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर ओबामांवर सगळीकडून टीका होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ओबामांना लक्ष्य केले जात आहे. या कँसरचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांनी एकत्र यायला हवे, असे ओबामा म्हणाले होते.
या घटनेसंदर्भात शोक व्यक्त केल्यानंतर ओबामा हे मरथा वाइनयार्ड येथे सुमारे पाच तास गोल्फ खेळले, असे ब्रिटिश न्‍यूज वेबसाइट डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेच्या सैन्याचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल राल्फ पीटर्स म्हणाले की, 2012 मध्ये एक अमेरिकन पत्रकार गायब होतो. ISIS दहशतवाद्यांनी त्याचे शीर कापल्याचा व्हिडीओ समोर येतो. तुम्ही (ओबामा) त्यावर प्रतिक्रिया देता आणि गोल्फ खेळायला निघून जाता. राष्ट्रपतीकडून यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा होऊ शकत नाही.

एबीसी न्यूजचे पॉलिटिकल डायरेक्टर रिक क्लेन हे फॉक्स न्यूजचे अँकर ग्रेटा वेन सुस्तेरेन यांच्याशी बोलताना म्हणाले, राष्ट्रपतींना स्वतःची जराही काळजी नाही. हा प्रकार म्हणजे, एक वाद असल्याचे मी मानतो. तर माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बूश यांनी मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या मथळ्यामध्येच ओबामांवर टीका केली आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ओबामांवर हल्लाबोल केला जात आहे. ट्वीटरवर हजारोंच्या संख्येने त्यांच्यावर टीका होत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, ओबामांच्या या कृतीवर आलेल्या प्रतिक्रिया