आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama's Mistake, Now Suffer Thirty Years Terrorism Battle

'ओबामांची चूक, आता तीस वर्षे अतिरेक्यांशी लढा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री लियोन पेनेट्टा यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे इस्लामी स्टेटसंबंधित धोरण चुकीचे ठरवले आहे. अतिरेक्यांशी लढणे कठीण झाले असून हे युद्ध ३० वर्षांपर्यंत चालू शकते, असा इशारा पेनेट्टा यांनी दिला आहे.
इस्लामिक स्टेटविरुद्धचे युद्ध लिबिया, नायजेरिया, सोमालिया आणि येमनपर्यंत पसरले आहे. ओबामांनी २०११ मध्ये इराकमधून लष्कर मागे घेतले होते. मात्र, तेथील सुरक्षेच्या धोक्याकडे लक्ष देण्यात आले नव्हते.

लियोन पेनेट्टा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पहिल्या कार्यकाळात गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख आणि संरक्षणमंत्री होते. पेनेट्टा आणि तत्कालीन विदेशमंत्री हिलेरी क्लिंटन यांनी ओबामा यांना सिरिया धोरणाबाबत जागे केले होते. सिरियात राष्ट्राध्यक्ष बशरविरोधी बंडखोरांना शस्त्रास्त्र न देण्याची विनंती केली होती. मात्र, ओबामा यांनी हा प्रस्ताव मान्य केला नव्हता.

पेनेट्टा यांचे पुस्तक येणार
पेनेट्टा यांनी वर्दी फाइट्स अ ममॉयर ऑफ लीडरशिप इन वॉर अँड पीस शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे. पेंग्विन प्रकाशनाचे हे पुस्तक आहे.