आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama\'s Super Secret Smartphone With Security Measures

ओबामांचा ब्लॅकबेरी आहे सर्वात सुरक्षित फोन, किंमत आहे 20 लाखांपेक्षाही अधिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादे सेक्युरिटी अॅप किंवा काही खास ट्रिक्स वापरून तुमचा फोन सुरक्षित होईल असे तुम्हाला वाटत असेल. पण तसे असेल तर तुम्ही एकदा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा ब्लॅकबेरी फोन निश्चित पाहायला हवा. कारण हा जगातील सगळ्यात सुरक्षित फोन आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

ओबामांच्या भारत दौर्‍यासाठी सुरक्षेचे विविध उपाय केले जात असल्याचे आपण ऐकलेच असेल. विशेषतः रस्त्यावर CCTV कॅमेरे लावण्यापासून ते सर्व काही अपटूडेट केले जात आहे. त्यातप्रामणे आम्ही आपल्याला ओबामांच्या फोनबाबत माहिती देणार आहोत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार प्रेसिडेंट ओबामा व्हाइट हाउसच्या आत आणि बाहेर ब्लॅकबेरीचे डिव्हाइस वापरतात. ओबामांच्या फोनची सेक्युरिटी पासवर्डपेक्षा कित्येकपट अधिक आहे. कारण हॅकर्स, गुप्तहेर संस्था आणि इतर अनेक संघटनांपासून त्यांच्या फोनची सुरक्षा करावी लागते.

किंमत
slashgear या वेबसाईटने सुत्रांच्या हवाल्याने 2009 मध्ये एक वृत्त प्रकाशित केले होते. त्यात ओबामांच्या ब्लॅकबेरीची किंमत 3,300 डॉलर (सुमारे 20 लाख 35 हजार 596 रुपये) आहे. आता एवढ्या महागड्या फोनमध्ये फिचर्स कसे असतील याचा अंदाज तुम्ही सहज लावू शकता.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ओबामांच्या फोनबाबत...
अखेरच्या स्लाइडवर पाहा ओबामांचा व्हिडिओ...