आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लठ्ठपणा बाळाच्या वाढीस मारक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - गरोदरपणात आईचे वजन मर्यादेपेक्षा जास्त असल्यास जन्मानंतर सुरुवातीच्या काळात बाळाच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. बाळसे न धरल्यास अशा मुलांच्या मेंदूचा विकास नीटपणे होत नाही, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
लोवा विद्यापीठ आणि मिनेसोटा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. लठ्ठ मातांच्या अपत्यांचे वजन सर्वसामान्य मातांच्या अपत्यांपेक्षा 308 ग्रॅमने कमी असल्याचे आणि त्यांची वाढही अर्ध्या इंचाने कमी होत असल्याचे त्यांना आढळून आले. दोन आठवडे ते 3 महिने वयाची ही मुले होती. प्रा. केटी लार्सन ओडे यांनी सांगितले की, या मुलांचा विकास सर्वसाधारण मुलांप्रमाणे होत नसल्याचे आमच्या लक्षात आले. असे होण्याची दोन कारणे असावीत. एक म्हणजे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती दुबळी करण्याचे काम चरबीच्या पेशी करतात. मात्र जेव्हा एखादी प्रौढ व्यक्ती लठ्ठ असते तेव्हा या पेशींचा दाह होतो. ही आणीबाणीची परिस्थिती असते आणि मातेच्या अशा रोगप्रतिकारक शक्तीचा परिणाम बाळाच्या विकसित होणा-या रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो.