आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये मुलींना मिळणार आता भाड्याने बॉयफ्रेंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनमधील एका ऑनलाइन सेल्स फर्मने युवतींना भाड्याने बॉयफ्रेंड देण्याची अनोखी सेवा सुरु केली आहे. चीनमध्ये सिंगल राहणा-या मुलींसाठी, खासकरून बॉयफ्रेंडबाबत चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागणा-या मुली व अविवाहित महिलांची गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या फर्मला आशा आहे की, पुढील महिन्यात सुरु होत असलेले चीनी नववर्षाच्या दिवशी लाखो चीनी मुली व महिला या अनोख्या सेवेचा लाभ घेतील. चीनी नव वर्षाच्या निमित्ताने चीनमधील लोक एकमेंकांना व कुटुंबियांतील सदस्यांना भेटून आनंद साजरा करतात.

यावेळी सिंगल आणि वर्किंग मुलींना डिनर टेबलवर आपले आई-वडिल अथवा नातेवाईक प्रश्न विचारतात की, काय तुला कोणी बॉयफ्रेंड मिळाला?. ज्या मुलींना ही सेवा देऊ केली आहे की त्यांना आतापर्यंत मिस्टर राइट/परफेक्शनिस्ट मिळाला नाही हे उघड असणार आहे. मात्र त्यांना किमान त्यांच्या नातेवाईकांपुढे किमान कमीपणा वाटणार नाही, असे फर्मचे म्हणणे आहे. म्हणूनच हीच संधी साधत आम्ही आमचे फर्म सुरु करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 'ताओबाओ डॉट कॉम' वर भाड्याने बॉयफ्रेंडशी संबंधित 260 पेक्षा जास्त सेवा उपलब्ध आहेत. व रोज सेवांची संख्या वाढत चालली आहे.

आणखी माहिती वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...