आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यालयीन राजकारण आणते मैत्रीत दुरावा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरांटो - स्वत:ला कार्यालयीन राजकारणाचा बळी समजणारे लोक चांगले मित्र गमावून बसतात. असे लोक स्वत: मानसिक तणावात असतात तसेच आपल्या समस्या इतरांना सांगून सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात सहका-यांकडूनही दुर्लक्षिले जातात, असे एका अध्ययनात सिद्ध झाले आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या सौंडर स्कूल ऑफ बिझनेसने या संबंधीचा संशोधन अहवाल सादर केला आहे. या संशोधनात असे स्पष्ट झाले की, जे लोक स्वत:ला कार्यालयीन राजकारणाचा बळी समजतात किंवा त्याबाबत वारंवार तक्रारी करतात ते सहकारी आणि आपल्या मित्रांद्वारे दुर्लक्षिले जातात.
अशा परिस्थितीत मित्र गमावू नयेत यासाठी प्रोफेसर कार्ल अ‍ॅक्विनो यांनी चांगला उपाय सांगितला आहे की, जर तुमच्यासोबत राजकारण होत आहे, किंवा तुमच्या योग्यतेनुसार फायदे मिळत नाहीत असे वाटत असेल सर्वप्रथम या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरूवात करा. इतर लोक आपल्याविषयी काय म्हणतात, हे प्रत्येकालाच जाणून घ्यायला आवडते.. विशेषत: ज्या ऑफिसमध्ये सहका-यांनी एखाद्याला स्वीकारल्यानंतर त्याच्या बढतीचा मार्ग खुला होतो. तसेच ऑफिस कर्मचा-यांमधील रुबाब वाढतो, त्यासाठीच बहुतेक लोकांना दुसरे आपल्याविषयी काय बोलतात, हे जाणून घेणे आवश्यक वाटते.
मैत्री निभावणं शिकलो