आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल,गॅस प्रकल्प दहशतवाद्यांच्या रडारवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्जेरियात गॅस प्रकल्पावर मुस्लिम दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे हे सत्य अधोरेखित झाले की, तेल, गॅस प्रकल्प आणि उत्पादनस्थळं दहशतवाद्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. सैन्याच्या कारवाईनंतरच अपहृतांची सुटका शक्य झाली. हल्ल्यात 40 अपहृत मारले गेले होते. यात अनेक परदेशी नागरिकही होते. तेल, गॅस प्रकल्पांवर झालेल्या काही हल्ल्यांची ही माहिती...

पाकिस्तान
दहशतवाद्यांनी 10 जून 2011 ला बलुचिस्तानात उच गॅस प्रकल्पावर तैनात एक पोलिस कर्मचारी आणि दोन रखवालदारांचे अपहरण केले. कालांतराने पोलिस कर्मचारी आणि एका रखवालदाराचा मृतदेह आढळून आला. दुस-या रखवालदाराचा अद्यापही शोध सुरू आहे.

इथिओपिया
एप्रिल 2007 मध्ये फुटीरवादी ओगाडेन नॅशनल फ्रंटच्या बंदूकधा-यांनी एका चिनी कंपनीतर्फे चालवल्या जाणा-या तेल प्रकल्पावर हल्ला चढवला होता. हल्ल्यात 9 चिनी कर्मचा-यांसह 74 जण मारले गेले. 7 चिनी कर्मचा-यांना ओलिस ठेवण्यात आले.

सौदी अरब
2006 मध्ये अल् कायदाने अबक्वेक येथील जगातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर हल्ला चढवला होता. सरकारी सुरक्षारक्षकांनी हा हल्ला परतवून लावला होता. दोन सुरक्षारक्षक आणि दोन हल्लेखोर दहशतवादी मारले गेले होते. घटनेनंतर कच्च्या तेलाच्या दरात दोन डॉलर प्रतिबॅरल इतकी वाढ झाली होती.