आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Cryptography Technique Causing Data Theft In Mobiles

धोकादायकः जुने तंत्रज्ञान ठरले मोबाइल डाटा चोरीचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन - बहुतांश मोबाइलमध्ये 1970 च्या दशकातील जुन्या क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून यामुळे मोबाइलमधील माहिती सहजपणे चोरी होऊ शकते, असे अमेरिकेत होणार्‍या ब्लॅक हॅट सुरक्षा परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. क्रिप्टोग्राफीला संवादाचे सुरक्षित तंत्रज्ञान मानले जाते. परंतु जुन्या क्रिप्टोग्राफीमुळे मोबाइलमध्ये घुसखोरी करून माहिती चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जुन्या क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करत असलेल्या सिमच्या मोबाइलची असुरक्षितता वाढली आहे. अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सुरक्षा प्रयोगशाळेशी संबंधित क्रिप्टोग्राफीतज्ज्ञ कस्टर्न नोल यांनी एक पद्धत विकसित केली असून त्याद्वारे मोबाइलचे लोकेशन, एसएमएस कार्यप्रणाली तसेच व्हॉइसमेल क्रमांकसुद्धा बदलता येऊ शकते. 31 जुलै रोजी लॉस वेगासमध्ये आयोजित ब्लॅक हॅट परिषदेत सिमकार्ड रुटिंगचे प्रदर्शन होणार असल्याचे नोल यांनी सांगितले.
सिमच्या ऑपरेटरद्वारा पाठवले जाणारे कंपनीचे कॉल्स आणि सॉफ्टवेअर अपडेट इत्यादी कमांड देणार्‍या सिमकार्डचा नोल सध्या अभ्यास करत आहेत. जगभरात सध्या 7 अब्जांपेक्षा अधिक सिमकार्ड कार्यान्वित आहेत. सुरक्षा आणि गोपनीयतेच्या खात्रीसाठी सिमकार्डद्वारा माहितीची नोंद केली जात असते, परंतु नोंदीचे निकष नेहमी बदलत असतात. बहुतांश सिमकार्डद्वारा 1970 च्या दशकातील डाटा इन्सक्रिप्शन स्टँडर्ड (डीईएस) नामक अत्यंत कमकुवत अशा नोंदीच्या निकषाचा वापर केला जातो, असे नोलच्या कंपनीच्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे. डीईएस कमजोर असल्यामुळे अनेक ऑपरेटर अधिक सुरक्षित असलेल्या तंत्रज्ञानांचा वापर करत आहेत.