आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी महासागराच्या तळाशी प्राचीन बेटाचे अवशेष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- हिंदी महासागराच्या तळाशी एका प्राचीन भूखंडाचे अवशेष सापडले आहेत. तो किमान 2 हजार ते 8 हजार कोटी 50 लाख वर्षे जुना असू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.
तळाखाली सापडलेल्या बेटाला मॉरिशिया असे नाव देण्यात आले आहे. आधुनिक जगाची निर्मिती होत असताना भूभागाचे तुकडे सागरातील अजस्त्र लाटांमध्ये हरवून बसले होते. ‘नेचर जिओसायन्स’ नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. मॉरिशसच्या समुद्रकिनाºयावर सापडलेल्या वाळूंच्या कणाच्या अभ्यासानंतर या निष्कर्षावर पोहोचले आहेत. हा भूखंड मॉरिशस आणि हिंदी महासागरात 10 किलोमीटर खाली पट्ट्याच्या स्वरूपात पाहायला मिळू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. सुमारे साडेआठ कोटी वर्षांपूर्वी भारत मेडागास्करहून सध्याच्या स्थितीकडे जाऊ लागला तेव्हा महाबेटाचा काही भाग गळून पडला आणि सागरी लाटांमध्ये हरवून बसला.

75 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी महाबेट
सुमारे 75 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी महाबेटाच्या स्वरूपात होती. त्याला रोडिनिया म्हटले जाते. भारत, मादागास्करजवळ होता, परंतु आता त्यात हजारो किलोमीटरचा समुद्र आहे. त्याच महाबेटातील काही तुकड्यांना शोधून काढण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

कशी मिळाली माहिती ?
मॉरिशसच्या जवळील किनाºयावर सापडलेली वाळू या संशोधनासाठी महत्त्वाची ठरली आहे. सापडलेले वाळूचे कण 90 लाख वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातील अवशेष असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यात काही धातूचे अवशेष सापडले आहेत.