टाकाऊ पासून टीकाऊची अनेक उदाहरणे
आपण पाहिली असतील. मात्र फॅशन जगतातील सर्वाधिक लोकप्रिय अशी जिन्सचा असा वापर स्वप्नातही कोणी केला नसेल. जिन्सच्या टाकाऊ पॅन्ट्सना काही क्रिएटीव्ह लोकांनी चक्क फ्लॉवर पॉट बनवलंय. हे फ्लॉवर पॉट दिसायला तर सुंदर दिसतातच त्याच बरोबर एकदम आगळे वेगळे रुप असल्याने अनेकांच्या नजरा चटकन खेचून घेतात. हे फ्लॉवरपॉट पाहताना पाहणार्याला धड नसलेले शरीर असेच काही तर भासत असेल. संपूर्ण पॅन्टमध्ये माती भरून त्यात छोटछोटी रोपटे लावण्याचा हा प्रकार थोडासा वेगळा आणि क्रीएटीव्ह आहे. अशा जिन्स प्रत्येकाच्या घरात असतात. सुरूवातीला आवडीने घातल असलेल्या या जिन्स काही वर्षांनी नकोशा वाटायला लागतात. असा वेळी यांना कापून बरमोडा अन्यथा फिटींगला येत नसल्याने त्या फेकून द्याव्या लागतात. मात्र या ट्रीकने तुम्ही त्यांच्या पुन्हा वापर करू शकतात. त्यासोबत पर्यावरण वाचवण्यासाठी तुमचा हातभारही लागू शकतो... कशी वाटली ही आयडिया... चला तर मग तुमच्या फाटक्या, जुन्या, टाकाऊ जिन्स काढून तुम्ही सुध्दा करून पाहा हा प्रयोग....