आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

111 वर्षांचे आजोबा सर्वात वयोवृद्ध, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेतील 111 वर्षांच्या एका व्यक्तीची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. ते जगातील सर्वाधिक वृद्ध व्यक्ती ठरले आहेत.
डॉ. अलेक्झांडर इमिच असे त्यांचे नाव आहे. ते पॅरासायकॉलॉजिस्ट आणि निवृत्त रसायनशास्त्रज्ञ आहेत. न्यूयॉर्क शहरातील सर्वात बुजुर्ग अशी त्यांची ओळखही सांगितली जाते. इटलीचे आटरुरो लिकाटा यांची याअगोदर सर्वाधिक वयाची व्यक्ती म्हणून नोंद होती. परंतु त्यांचे 111 वर्षे आणि 357 व्या दिवशी निधन झाले. त्यामुळे आता इमिच हेच जगातील सर्वात बुजुर्ग ठरले असल्याचे गिनीज बुककडून जाहीर करण्यात आले.
इमिच यांचा जन्म सध्याच्या पोलंडमध्ये (तत्कालीन झेस्तोश्चोवा) 4 फेब्रुवारी 1903 मध्ये झाला. 1951 मध्ये पत्नी वेला यांच्यासह सोव्हिएत युनियनमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्या वेळी हे दांपत्य मॅनहटनमध्ये राहत होते. परंतु 1986 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

स्वत:च चकित
इमिच यांनी एक शतकाहून अधिक काळ पाहिला आहे. ते स्वत:देखील आपल्या दीर्घायूविषयी आश्चर्य व्यक्त करतात. परंतु चांगली गुणसूत्रे आणि एकूणच निरोगी दिनचर्येला ते श्रेय देतात.