आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात प्राचीन दारू सापडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- फ्रान्स व इतर देशांत वाइन उत्पादक 150 -150 वर्षे जुन्या वाइनच्या बाटल्या मोठ्या अभिमानाने जतन करून ठेवतात. तिथे चीनमध्ये पुरातत्त्व संशोधकांना जवळपास 3000 वर्षांपूर्वीचा दारूने भरलेला तांब्याचा प्राचीन कलश हाती लागला आहे. ही दारू जगातील सर्वात जुनी दारू असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
चीनच्या शिन्हुआ संवाद समितीने दिलेल्या माहितीनुसार ही दारू बाओजी शहरात शिगुशान या डोंगरावर कबरीचे खोदकाम सुरू असताना पितळेचे भांडे आढळले. हे भांडे एका उच्चवर्गीय व्यक्तीच्या कबरीत आढळले असून ते पश्चिमी झाओ राजवटीतील (1046 ते 771 इसवीसनपूर्व) असावे, असा अंदाज आहे. बाओजी पुरातत्त्व विद्यापीठाचे संचालक लियू जून यांच्या मते या पितळेच्या
भांढ्यातील द्रव्य हे इतिहासातील सर्वात जुनी दारू आहे. त्या कबरीत पितळेची सहा
भांडी सापडली. या भांड्यात अतिशय मजबूतरीत्या झाकण बांधून ही दारू बंद ठेवण्यात आली होती. पैकी काही भांड्याची झाकणे उघडली जात नसल्याने त्यातील दारूचे रहस्य कायम आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे झाओ वंशाच्या आधी शांग वंशाच्या काळात चीनचे नागरिक प्रचंड दारूप्रेमी होते. त्यांचे व्यसन व भ्रष्टाचार राजाचे साम्राज्य लयाला नेण्यास कारणीभूत ठरला. झाओ काळात लोकांमधील दारूचे व्यसन नियंत्रित
ठेवण्यासाठी विशेष यंत्रे बसवण्यात आली होती. ही यंत्रे दारूच्या बाटल्या, भांड्यांवर बसवल्यावर त्यातून मोजकीच दारू बाहेर पडत असे. संशोधनात हे यंत्रही सापडले असून ते 95 सेंटिमीटर लांबीचे आहे.
3000 वर्षे जुनी दारू- चीनच्या पुरातत्त्ववाद्यांनी केलेला दावा खरा ठरला तर ही दारू जवळपास 3000 वर्षे जुनी असेल. जर्मनीतील पपल्जा संग्रहालयात शतकापासून जतन करून ठेवण्यात आलेली 1650 वर्षे जुनी दारू ही जगातील सर्वात जुनी दारू समजली जात असे. दारूची ही बाटली रोमन काळात उच्चवर्णीय व्यक्तीसोबत 350 इसवीसनमधील दफन करण्यात आली होती. याचा शोध 1867 मध्ये लागला होता.