लंडन - ब्रिटनच्या राजघराण्यातील नवीन पाहुण्याचे आगमन होऊन काही महिनेही लोटले नाही तोच देशात आणखी एका राजेशाही विवाहाची चर्चा रंगू लागली आहे.प्रिन्स हॅरीने (29) गर्लफ्रेंड क्रेसिडा बोनास (24) हिला भोजनाचे निमंत्रण दिल्यावरून या चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराणीच्या सँड्रिगहम राजवाड्यात येण्याचे ‘अनौपचारिक’ निमंत्रण हॅरीने क्रेसिडाला पाठवले होते.
विशेष पार्टीमध्ये हॅरीची चुलत भावंडेदेखील सहभागी झाली. त्यात राजकुमारी ऑगीन (23) हिचाही समावेश होता. ऑगीननेच पहिल्यांदा क्रेसिडा आणि हॅरी यांची भेट घडवून आणली होती. एक वर्षानंतर दोघे पुन्हा भेटले. त्यामुळे दोघांतील जवळीक वाढल्याची आणि दोघेही लवकरच विवाहबद्ध होण्याची चर्चा रंगली आहे. त्याला अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी पुढील वर्षी हॅरीचे दोनाचे चार होतील, असा अंदाज आहे.