आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरिया प्रश्नी रशिया-अमेरिका आमने सामने, जग पुन्हा शीतयुध्‍दाच्या उंबरठ्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - शीतयुद्धाच्या वेळी आमने-सामने आलेले अमेरिका -रशिया यांच्यात सिरिया प्रश्नी संघर्षाची शक्यता आहे. त्यामुळे जग पुन्हा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिरियावर लष्करी कारवाई कराल, तर परिणाम वाईट होतील, असा इशारा सोमवारी रशियाकडून अमेरिकेला देण्यात आला.


अमेरिका आणि रशियातील शाब्दिक लढाईला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांचे वक्तव्य कारणीभूत ठरले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जिइ लाव्हरोव्ह यांनी केरी यांना कारवाई करण्याचा विचार करू नका, असे बजावले आहे. लाव्हरोव्ह यांनी रविवारी केरी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्या संभाषणात लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचा नेमका तपशील समजू शकला नसला तरी रशियाकडून तीव्र नाराजी व्यक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिरियातील हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकेने अंतर्गत पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर रशियाने आक्षेप घेतला आहे. अशा कारवाई गरज नसल्याचे लाव्हरोव्ह यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे दमास्कसवर दबाव वाढवणे गैर आहे. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असा दावा रशियाने या संभाषणातून केला. दरम्यान, सिरियातील हिंसाचार थांबणार नसेल तर संयुक्त राष्ट्राचा पाठिंब्याशिवाय देखील लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या ब्रिटनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री विल्यम हॉग यांनी हे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने या मुद्द्यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोइस ऑलंद यांच्याशी चर्चा केली. सिरियाच्या विरोधात विविध देशांची आघाडी झाली तर शेजारी देश तुर्कीने सोमवारी स्पष्ट केले.


तपासासाठी तज्ज्ञ रवाना :बान
सेऊल । सिरियातील रासायनिक हल्ल्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक रवाना झाले आहे. प्रत्येक तास महत्त्वाचा असून थोडाही वेळ वाया न घालता तपास सुरू होईल, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की-मून यांनी सोमवारी स्पष्ट केले.


दमास्कसवर हल्ला
सिरियाची राजधानी दमास्कसवर सोमवारी हवाई हल्ला झाला. त्यात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला दहशतवाद्यांकडून झाल्याचे सांगण्यात येते. त्यात एका मशिदीचे नुकसान झाले. जखमींमध्ये एक महिला व लहान मुलांचा समावेश आहे.