आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Shaikh Hasina Come Into Power In Bangladesh, Won 232 Seats Out Of 300

बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचीच सत्ता, 300 पैकी 232 जागा मिळाल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशातील सुमारे 18 राजकीय पक्षांनी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगसाठी सत्तेचा एकतर्फी मार्ग सुकर झाला आहे. बांगलादेशात निवडणुकीदरम्यान रविवारी प्रचंड हिंसाचार झाला होता. त्यात 21 जणांचा बळी गेला होता. या निवडणुकीचे निकाल सोमवारी घोषित करण्यात आले. त्यात पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगला 300 पैकी 232 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी सरकारला 151 जागांची आवश्यकता होती.
मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) या निवडणुका म्हणजे तमाशा असल्याचे म्हणत त्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 18 राजकीय पक्षांनी संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीविरोधात सोमवारपासून 48 तासांच्या बंदचे आवाहन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त काजी रकिबुद्दीन अहमद यांनी सांगितले की, 97 टक्के मतदान केंद्रांवर निष्पक्ष निवडणुका पार पडल्या आहेत. जर सर्वच पक्ष यात सहभागी झाले असते तर बरे झाले असते. राजकीय विश्लेषकांच्या
म्हणण्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या वैधच आहे. तथापि विरोधकांच्या बायकॉटमुळे व कमी मतदान झाल्याने त्यांच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. यंदा अवघे 22 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, देशात विरोधक गेल्या 25 दिवसांपासून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या बंद व संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी ढाकाचा अन्य भागांशी असलेला संपर्क जवळपास तुटला आहे
मंत्र्याने दुस-याला हरवले
निवडणुकीत कॅबिनेट मंत्री व जतीया पार्टीच्या उमेदवार सलमा इस्लाम यांनी दुसरे मंत्री अब्दुल मन्नान खान यांचा पराभव केला. या जागेवर उमेदवार ठरवताना आघाडी झाली नव्हती. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 41 मतदान केंद्रांवर मतदानच झाले नाही, तर अन्य ठिकाणी झालेल्या हिंसाचारात 21 जण ठार झाले होते.